ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ औषधाचे उत्पादन घेण्यास दोन कंपन्यांना भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाने परवानगी मिळाली आहे. सिप्ला आणि हेटेरो या कंपन्या आता भारतात रेमडेसिवीरचे उत्पादन घेतील.
कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिवीर हे औषध उपयुक्त ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या औषधाला ग्रीन सिग्नल दिला होता. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या औषधाची निर्मिती करण्यास भारतीय कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. सिप्ला आणि हेटेरो या कंपन्या या औषधाची निर्मिती करतील. तसेच त्यांना या औषधाची विक्रीही करता येईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात येईल.
दरम्यान, महाराष्ट्र सरकार ‘रेमडेसिवीर’च्या 10 हजार इंजेक्शनची खरेदी बांग्लादेशकडून करणार होते. मात्र, काही कारणांमुळे ही आयात थांबवण्यात आली.