प्रतिनिधी / पणजी
सिबा आणि इन्फीनियट थ्रीडीतर्फे तयार केलेले मास्क खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. केदार रायकर, ओल्ड गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्याकडे प्रदान करण्यात आले. युवा समाजसेवक सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा मास्क प्रदान सोहळा झाला. आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱयांना कोविड 19 लढय़ात सहकार्य करण्याच्या उद्देशाने सदर मास्क प्रदान करण्यात आले.