ऑनलाईन टीम / सिमला :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पहिल्यांदाच सिमल्यातील सफरचंदांची विक्री ऑनलाइन करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न आणि विपणन समितीद्वारे (एपीएमसी) घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता प्रायोगिक तत्त्वावर एपीएमसी द्वारे सफरचंदाची ऑनलाइन विक्री करण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे देशातील खरेदीदार घरी बसून आता कोणत्याही बाजारपेठेतून सफरचंदांची बोली बोली लावून खरेदी करू शकतील.
एपीएमसीचे चेअरमन नरेश शर्मा यांनी सांगितले की, सफरचंदाच्या सिझनमध्ये मंडईमध्ये सोशल डिस्टंसिंग असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ई-नेम ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून एपीएमसी द्वारे व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सफरचंदाच्या सीझनमध्ये चेन्नई, कोलकत्ता, अहमदाबाद, दिल्ली मुंबई, मद्राससह अनेक राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी सफरचंदांची खरेदी करण्यासाठी सिमला मध्ये येतात.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी सिमला मध्ये येऊ शकले नाही तरी, आता ऑनलाइन बोली लावून सफरचंदांची खरेदी करू शकतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारने ई-नेम पोर्टलला पाच हजार पेक्षा अधिक किसानांना जोडले आहे. या पोर्टल द्वारे होणाऱ्या विक्रीचे पैसे त्यांना त्यांच्या खात्यात डायरेक्ट पाठवले जातात. त्यामुळे ऑनलाईन विक्री शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.
दरम्यान, यापूर्वी सोलन बाजारपेठमध्ये सफरचंद आणि अन्य भाज्यांची ऑनलाईन विक्री करण्यात आली आहे.