आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षामध्ये (2021-22)सरकारी पातळीवर मिळणाऱया मदतीमुळे भारतीय सिमेंट उद्योगाला हातभार लाभत असून दरम्यान सिमेंटची विक्री वाढत राहिली आहे. आगामी काळात सदरच्या उद्योगालाही उज्ज्वल भविष्य राहणार असल्याचे अल्ट्राटेक सिमेंटचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले आहे.
नवीन प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजना या योजनांतर्गत सरकारचे सहकार्य मिळत असल्यामुळे सिमेंट उद्योगाला तेजी प्राप्त करण्यास मदत मिळणार असल्याचे आदित्य बिर्ला समूह फर्मने नवीन वार्षिक अहवालामधून सांगितले आहे.
घरांचे प्रकल्प व इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे सिमेंटच्या मागणीत सातत्य राहिलं आहे. यामुळेच या क्षेत्रातील कंपन्यांची स्थिती मजबूत होताना दिसते आहे. सरकारने 2022 पर्यंत सर्वांना घरे ही मोहीम राबवली असून सिमेंटची विक्री वाढत राहिली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या उद्योगाचे उज्ज्वल भविष्य पहावयास मिळणार असून कोरोना संसर्ग आणि महामारीचा सिमेंट उद्योगावर परिणाम राहिला आहे. सिमेंट उद्योगामध्ये 10 ते 12 टक्क्यांची घसरण राहिली असली तरी दुसऱया सहामाहीत यामध्ये तेजी निर्माण होण्याचे संकेत आहेत.