दराबाबतचा निर्णय लवकर घेतला नाही तर सोमवारपासून बेमुदत बंद
प्रतिनिधी / बेळगाव
सिमेंट कंपन्यांनी दरामध्ये अचानकपणे वाढ करुन सिमेंट विपेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. खरेदी अधिक दराने असली तर अचानक कमी दराने सिमेंट विक्री करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे सिमेंट कंपन्यांकडे सिमेंट विपेत्यांचे करोडो रुपये शिल्लक पडत आहेत. मात्र यामध्ये सर्वसामान्य सिमेंट विपेते भरडले जात आहेत. वारंवार होणाऱया दर बदलामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे सिमेंट विपेत्यांनी बुधवारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिह्यातील सर्व सिमेंट विपेत्यांनी आपली दुकाने बंद करुन कंपन्यांचा निषेध नोंदविला आहे.
कोरोना काळात एक तर व्यवसाय कमी आहे. त्यातच सिमेंट कंपन्या सिमेंट विपेत्यांना अचानकपणे दर वाढ करत आहेत. कधीकधी दर कमी करत आहेत. त्याचा फटका सिमेंट विपेत्यांना बसत आहे. त्यामुळे सिमेंट विपेत्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देवून दुकाने बंद करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी दुकाने बंद केली आहेत. याचबरोबर सोमवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर बेमुदत बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सिमेंट कंपन्यांच्या बेजबाबदारपणामुळे सर्वसामान्य घर बांधणाऱया कुटुंबांना मोठा त्रास होत आहे. एक दिवस 400 रुपये दराने सिमेंटचे एक पिशवी खरेदी करावी लागत आहे तर एक दिवस 350 किंवा 340 रुपये या दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ग्राहकाचा समज असा झाला आहे की सिमेंट विपेतेच हा दर ठरवत आहेत. म्हणून सिमेंट विपेत्यांबद्दल नाराजी निर्माण होत आहे. मात्र यामध्ये सिमेंट विपेत्यांचा कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी पुकारलेल्या बंदला संपूर्ण जिह्यातील सिमेंट विपेत्यांनी प्रतिसाद दिला. जिह्यातील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे काही प्रमाणात जनतेला त्रास झाला. मात्र त्याबद्दल सिमेंट असोसिएशनने दिलगीरी व्यक्त केली आहे. तुमच्यासाठीच आम्ही हा बंद करत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील सर्वांनीच आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील सिमेंट विक्री असोसिएशनने केले आहे.