वृत्तसंस्था/ पॅरीस
रुमानियाची माजी टॉप सिडेड महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपला आता पॅट्रिक मोराटोग्लू यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. फ्रान्सचे टेनिस प्रशिक्षक मोराटोग्लू हे हॅलेपचे पूर्णवेळ टेनिस प्रशिक्षक म्हणून राहतील.
मोराटोग्लू यांनी यापुर्वी अमेरिकेच्या माजी टॉप सिडेड सेरेना विल्यम्सला टेनिसचे मार्गदर्शन देत होते. सेरेनाला बराच कालावधी मोराटोग्लू हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले होते. हॅलेपने 2018 साली प्रेंच ग्रँडस्लॅम तर 2019 साली विम्बल्डन ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकाविले होते. गेल्या वर्षी वारंवार दुखापतीमुळे तिला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले होते. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत हॅलेप सध्या विसाव्या स्थानावर आहे.