वृत्तसंस्था/ लाँस एंजिल्स
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय महिला ऍथलीट् तसेच पाचवेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळणारी पोल व्हॉल्टर सिमोन बाईल्सने शनिवारी आपले ऍथलेटिवस क्षेत्रात शानदार पुनरागमन केले आहे. इंडियानापोलीस येथे सुरू असलेल्या अमेरिकन क्लासिक ऍथलेटिक्स स्पर्धेत अमेरिकेची महिला जिम्नॅस्ट सुपरस्टार बाईल्सने व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली. बाईल्सचे लक्ष आता टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदकावर आहे. तिने आतापर्यंत पाचवेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविले असून 2019 च्या विश्व चॅम्पियन्सशीप स्पर्धेत ऑलराऊंड जेतेपद पटकाविले आहे. आता ती 3 ते 6 जून दरम्यान होणाऱया अमेरिकन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत, त्यानंतर 24 ते 27 जून दरम्यान होणाऱया अमेरिकन ऑलिंपिक चाचणी स्पर्धेत बाईल्स सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेत बाईल्सने ऑलराऊंड प्रकारात 58.400 गुणांसह पहिले स्थान तर जॉर्डन चिलेसने 57.100 गुणांसह दुसरे आणि डिकेलोने 56.100 गुणांसह तिसरे स्थान मिळविले