प्रतिनिधी / वास्को
गोवा शिपयार्ड भारतीय नौदलासाठी डॅमेज कंट्रोल सिम्युलेटर (डीसीएस) बांधणार आहे. यासंबंधीच्या कारारावर काल शुक्रवारी गोवा शिपयार्डमध्ये सहय़ां करण्यात आल्या.
आतापर्यत गोवा शिपयार्डने संरक्षण दलासाठी विविध प्रकारचे सहा सिम्युलेटर बांधलेले आहेत. अलिकडेच गोवा शिपयार्डने एक सिम्युलेटर शेजारील देशात निर्यातही केला आहे. प्रशिक्षण संस्थांमध्ये या सिम्युलेटरचा वापर होत आहे.
गेल्या काही वर्षात गोवा शिपयार्डला भारतीय नौदलासाठी 2 फ्रिगेटस् व तटरक्षक दलासाठी 5 अपतटरीय गस्ती नौका बांधण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिपयार्डने व्यावसायीय/संरक्षण स्पर्धांत ऑर्डर देखील प्राप्त केले आहेत. भारतीय तटरक्षक दलासाठी 2 प्रदुषण नियंत्रण जहाजे गोवा शिपयार्ड बांधणार असून लवकरच या करारावर सहय़ा होणार असल्याचे शिपयार्डचे जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांनी सांगितले.