गरिबांसाठी दहा टक्के लस उपलब्ध करणार
पुणे / प्रतिनिधी
भारतासह इतर देशातील गरीब लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी सिरम इन्स्टिटय़ूट आणि बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात करार झाला असून, त्यानुसार गरिबांना दहा टक्के लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लसीची अधिकाधिक किंमत 3 अमेरिकन डॉलर्स म्हणजे साधारण 225 ते 250 रुपयांच्या घरात असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिटय़ूटकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सिरम इन्स्टिटय़ूट ही आघाडीची औषधनिर्मिती करणारी मोठी कंपनी आहे. बिल गेट्स हे जगातील दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे कोरोनाच्या लढाईत मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिरम ही संस्था, उAन्न्घ् ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. उAन्न्घ् मार्फत निधी सिरम इन्स्टिटय़ूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिटय़ूट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे.
कोरोना संकटाच्या विळख्यात आज अवघे जग सापडले आहे. लस हाच या आजारावरील मार्ग असून, ही लस लवकरात लवकर तयार व्हावी, यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे काम सुरू केले आहे. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरिबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे.