वृत्तसंस्था/ कोलॉन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या कोलॉन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या मारीन सिलीकचे आव्हान पहिल्याच फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने संपुष्टात आणले.
सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात स्टीव्ह जॉन्सनने सिलीकचा 7-6 (7-3), 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. माजी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेत्या सिलीकला या सामन्यात आपली सर्व्हिस अधिकवेळ राखता आली नाही. अन्य सामन्यात आठव्या मानांकित मॅनेरिनोने ऍलेक्सी पॉपिरीनचा 6-2, 6-2, जपानच्या निशीओकाने ब्रिटनच्या एडमंडचा 6-4, 6-0 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.