पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी घेतला आढावा : बाधितांच्या नातेवाईकांना वॉर्डमध्ये प्रवेशबंदी, हॉस्पिटलची सुरक्षा वाढविली
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी आता एपीएमसी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी बिम्सला भेट देऊन तेथील सुरक्षा रक्षक व होमगार्डना मार्गदर्शन केले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना वॉर्डमध्ये प्रवेश देऊ नये, अशी सक्त सूचना त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिली.
गेल्या वषी अनेक अप्रिय घटना घडल्या होत्या. ढिसाळ सुरक्षा यंत्रणेमुळे दगडफेक, हाणामारी, जाळपोळच्या घटनाही सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात घडल्या होत्या. गेल्या वषीपेक्षा यंदा बाधितांची संख्या वाढत आहे. साहजिकच मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव पी. रविकुमार हे दोन दिवसांपूर्वी बेळगाव दौऱयावर आले होते. कोणत्याही परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱया कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश देऊ नये, अशी सक्त सूचना त्यांनी बिम्स प्रशासनाला केली होती. या पार्श्वभूमीवर बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनीही रुग्णांच्या नातेवाईकांना आवाहन करून अनावश्यकपणे कोणीही वॉर्डमध्ये प्रवेश करू नये, असे सांगितले होते. तरीही जेवण, फळे, पाण्याच्या बाटल्या, औषधे पोहोचविण्याच्या निमित्ताने बाधितांचे नातेवाईक वॉर्डमध्ये जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्या वाढत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना वॉर्डमध्ये प्रवेश देऊ नये, अशी सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने केली असून त्याची जबाबदारी आता पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन सिव्हिलमधील खासगी सुरक्षा रक्षक व गृहरक्षक दल जवानांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
वेगवेगळय़ा वॉर्डमध्ये सेवा बजावताना रुग्णांच्या सुरक्षेवर भर द्यावा. याबरोबरच त्यांच्या इतर नातेवाईकांना कोरोनाची लागण होऊ नये,
यासाठीच प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेशबंदीचा आदेश जारी केला आहे.
60 खासगी सुरक्षा रक्षक व 25 हून अधिक होमगार्ड
सध्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुमारे 60 खासगी सुरक्षा रक्षक व 25 हून अधिक होमगार्ड सेवा बजावत आहेत. त्यांना मार्गदर्शन करताना जावेद मुशापुरी म्हणाले, प्रत्येक वॉर्डच्या प्रवेशद्वारावर काटेकोरपणे तपासणी करावी. जिल्हय़ातील वेगवेगळय़ा भागातून उपचारासाठी गोरगरीब रुग्ण या इस्पितळात येतात. त्यांच्याशी हुज्जत न घालता सौजन्याने वागावे. कोरोनाचे धोके समजावून सांगून त्यांना वॉर्डमध्ये प्रवेश देऊ नये, अशा सूचना जावेद मुशापुरी यांनी केल्या.