356 बाधितांवर विलगीकरण विभागात सुरू आहेत उपचार
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या इतर रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलची सेवा बंद ठेवून केवळ कोरोना बाधितांवर उपचारासाठी हे इस्पितळ राखीव ठेवण्यात आले आहे. उपलब्ध माहितीवरून 20 जण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.
बिम्स प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात 356 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासांत 40 नवे रुग्ण उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. 336 जणांची प्रकृती स्थिर आहे.
प्रकृती नाजूक बनलेल्या 20 जणांवर एमआयसीयुमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर 95 पेक्षा अधिक जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. श्वसनाचा त्रास जाणवणाऱयांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे केवळ लक्षणे असणाऱया बाधितांवर उपचार करण्यावर भर देण्यात येत आहे.
मणिपाल इस्पितळाच्या तज्ञांशी येथील परिस्थितीविषयी चर्चा करण्यात येत असून एमआयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या 20 जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बिम्सच्या अधिकाऱयांनी दिली. ज्या मणिपाल इस्पितळाशी बिम्स प्रशासन चर्चा करते आहे त्याच इस्पितळात स्वत: मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या उपचार घेत आहेत.