ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु@ प्रतिनिधी
बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात गुरुवारी दुपारी सुमारे 30 वषीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. एपीएमसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात अनोळखी युवक बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून आपत्कालीन विभागात हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्या युवकाने आपल्या अंगावर चौकडा शर्ट परिधान केले असून सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. पोलीस ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संबंधितांनी 0831-2405250 या क्रमांकावर एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.