नवी दिल्ली
आयटी आणि नेटवर्किंगच्या क्षेत्रात जगात आघाडी घेणाऱया सिस्को कंपनीकडून येणाऱया काळात भारतातील आघाडीवरच्या अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्थांमधून 1200 जणांची भरती केली जाणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या आघाडीवरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पात्र उमेदवार सिस्कोला निवडायचे आहेत. इंटर्नशिप आणि कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची भरती केली जाणार असल्याचे सिस्कोने म्हटले आहे.