गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरीप्रकरणी सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी आढळणाऱयांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. शुक्रवारी दुपारी सुवर्णविधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरी प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत आली? सरकारने संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे? असा प्रश्न विचारला असता बसवराज बोम्मई यांनी वरील माहिती दिली.
राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सध्या सीआयडीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अहवाल येताच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. याचवेळी या प्रकरणात प्रमुख भूमिका निभावलेल्या किरण वीरणगौडर याच्यावर अद्याप का कारवाई झाली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मात्र गृहमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले.
कारमधून सोने केले होते लंपास…
9 जानेवारी 2021 रोजी मंगळूरहून कोल्हापूरला जाणारी कार अडविण्यात आली होती. सोन्याची तस्करी केली जात असल्याच्या माहितीवरून हत्तरगी टोल नाक्मयावर यमकनमर्डी पोलिसांनी कार अडविली होती. नंतर कारमधील 4 किलो 900 गॅम सोन्याची परस्पर विक्री करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्यासह चार पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.