बेळगावात दोन ठिकाणी कारवाई, सव्वाकिलो गांजा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
सीआयडी एनडीसी विभागाच्या अधिकाऱयांनी गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक केली आहे. अयोध्यानगर व धर्मवीर संभाजी चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून सव्वाकिलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
27 नोव्हेंबर रोजी अयोध्यानगर परिसरात अकिब जावेद मणियार (वय 27) याला अटक करून त्याच्याजवळून 12,200 रुपये किमतीचा 610 ग्रॅम गांजा, 530 रुपये रोख रक्कम व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सीईएन पोलीस स्थानकात अकिबवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई 26 नोव्हेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौक परिसरात करण्यात आली आहे. सैफअली माडीवाले (वय 27) रा. पिरनवाडी याला अटक करून त्याच्याजवळून 10,400 रुपये किमतीचा 520 ग्रॅम गांजा, 720 रुपये रोख रक्कम व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सीआयडी विभागाचे पोलीस निरीक्षक एस. के. कुरघोडी, लक्ष्मण हुंडरद, जगदीश बागण्णावर, जी. आर. शिरसंगी, चिदंबर चट्टरकी, पी. एच. दावणगेरे आदींनी ही कारवाई केली आहे.