श्रीनगरमध्ये गस्त घालणाऱया पथकावर हल्ला, तीन जवान जखमी, परिसरात शोधमोहीम
श्रीनगर / वृत्तसंस्था
श्रीनगरमधील लवापोरा भागात गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. सीआरपीएफच्या गस्ती पथक जवानांच्या तुकडीला टार्गेट केल्यानंतर धुमश्चक्री निर्माण झाली. या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले असून तीन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाल्याच्या वृत्ताला आयजी विजयकुमार यांनी दुजोरा दिला आहे.
हा हल्ला सीआरपीएफच्या 73 व्या बटालियनवर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील लवापोरा भागात सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला चढवला असून लष्कर-एöतोयबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असल्याचे आयजी विजयकुमार यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. तसेच या हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या भागात पूर्णपणे तणावाचे वातावरण होते. तसेच सुरक्षा बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. राज्य पोलीस दलाचे वरि÷ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.
हल्ल्यादरम्यान सीआरपीएफचे पथक लवापोरा भागात तैनात होते. याचदरम्यान वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी चौकात उभ्या असलेल्या सैनिकांवर हल्ला केला. ताबडतोब अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला. यात पाच सैनिक जखमी झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी सैनिकांना तातडीने उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान दोन सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचे पोलीस अधिकाऱयानी सांगितले. बऱयाच दिवसानंतर श्रीनगरमध्ये असा हल्ला घडला आहे. हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.