ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व लोकसंख्या सूचीबाबत (एनपीआर) सध्या देशभरात वातावरण तापले आहे. या कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे.
समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह अनेकांनी आपली मत व्यक्त केली आहेत. आता सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील ‘सीएए व एनपीआर’ चे समर्थन केले आहे.
समर्थन करताना रजनीकांत म्हणाले, सीसीएचा आपल्या देशातील नागरिकांवर कसलाच परिणाम होणार नाही. जर याचा परिणाम मुस्लीमांवर होणार असेल तर मी पहिला व्यक्ती असेल जो त्यांच्यासाठी उभा राहील. देशाबाहेच्या नागरिकांबाबत माहिती मिळवण्यासाठी एनपीआर आवश्यक आहे. एनआरसीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की आतापर्यंत हे तयार करण्यात आलेले नाही.