ऑनलाईन टीम / पुणे :
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज पुण्यात तिरंगा रॅली काढली. या रॅलीत तरुण-तरुणी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणींला देशातून कडाडून विरोध होत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज सीएएच्या समर्थनार्थ 300 फुटी तिरंग्यासोबत रॅली काढली. ‘देश की जरुरत सीएए’, ‘युवा मांगे सीएए’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गणेश खिंडकडून सेनापती बापट मार्ग रस्त्याने फर्ग्युसन महाविद्यालयाकडून ही रॅली शिवाजीनगर येथील मॉर्डन कॉलेजकडे गेली. तिथे या रॅलीचे सभेच रुपांतर झाले.