नवी दिल्ली
सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशनने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 546 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे, जो 28 टक्के अधिक नोंदला गेला आहे. याचसोबत कंपनीने उत्पन्नातही वाढ दर्शवली असल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षात समान अवधीत कंपनीने 425 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. उत्पन्न वाढून 1558 कोटी रुपयांवर पोहचले आहे.