बेंगळूर : वादग्रस्त सीडी प्रकरणातील ‘त्या’ युवतीने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले असून तुमच्या देखरेखीखालीच एसआयटीचा तपास व्हावा, अशी विनंती केली आहे. आपल्याला धमकी देण्यात आली असून आपल्याला आणि कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्या युवतीने पत्रामध्ये केली आहे. सरकारच्या कोणत्याही तपास पथकांवर आपल्याला विश्वास नाही. त्यामुळे तुम्हीच या प्रकरणात हस्तक्षेप करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती तिने केली आहे.दरम्यान, युवतीला आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी बेंगळूरमधील न्यायालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिला संरक्षण पुरविण्यासाठी एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह 8 महिला पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे.
Previous Articleराज्यात सोमवारी 2,792 नवे कोरोना रुग्ण
Next Article स्थगित क्वॉरी, दगड खाणी सुरु करण्याचा निर्णय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.