प्रतिनिधी
बेळगाव
कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आता कोरोना योद्धय़ांनाही त्याची बाधा होऊ लागली आहे. मुडलगी येथील एका 33 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस स्थानक सीलडाऊन करण्यात आले आहे तर निपाणी येथील मंडल पोलीस निरीक्षकाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.