शिवसेनेकडून सीपीआरला 50 लाखांची व्हेंटिलेटर्स प्रदान : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सीपीर प्रशासनाला 50 लाखांचे व्हेटिलेटर प्रदान करण्यात आली. ही व्हेटिलेटर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
प्रतिनिधी / कोल्हापूर
सध्या कोरोनाचे संकट आहे. या काळात आरोग्य यंत्रणा सुसज्ज, सक्षम असावी, असा आपला प्रयत्न आहे. गतवर्षी सीपीआरमधील कोरोना केअर सेंटरसाठी 1 कोटींचे बेड, कपाटे शिवसेनेकडून दिली होती. आता 50 लाखांची व्हेंटिलेटर्स हॉस्पिटलला शिवसेनेने दिली आहे. सीपीआर हॉस्पिटल सुसज्ज करण्यावर भर दिला जात आहे. याला प्राधान्य राहील, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने रविवारी येथील सीपीआर हॉस्पिटलला 50 लाखांची व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत 5 व्हेंटीलेटर सीपीआर प्रशासनाला प्रदान करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआरमध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सीमाभागातून रुग्ण दाखल होण्याची संख्या अधिक आहे. त्यांना व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता आहे. सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून शिवसेनेने सीपीआरला व्हेंटीलेटर दिली आहेत. भविष्यात अशाच पद्धतीने सीपीआरमधील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकरिता प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ.ाजित लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. अनिता सैबनवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय बर्गे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी परिवहन सभापती अजित मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना उपशहर प्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, किशोर घाटगे, अरुण सावंत, धनाजी दळवी, रहीम बागवान, अश्विन शेळके, निलेश हंकारे, रियाज बागवान, रणजीत मिणचेकर, सुनील करंबे, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, योगेश चौगुले, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, कृष्णा लोंढे, उदय पोतदार, डॉ. महेंद्रकुमार बनसोडे, डॉ. वसंत देशमुख, डॉ. रविंद्र रामटेके, डॉ. सुनिता रामानंद, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. कुंभोजकर, डॉ. वासंती पाटील, डॉ. राहुल बडे, डॉ. सुजाता नामे, डॉ. कारंडे, डॉ. अनिता मांडरे, डॉ. स्वेनिल शहा, डॉ. गिरीश कांबळे आदी उपस्थित होते.