कोरोना काळात सीपीआरची अविरत रूग्णसेवा, आवश्यक त्या ‘मेडीकल टेस्ट’ 24 तास उपलब्ध
प्रतिनिधी/कोल्हापूर
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय..अर्थात सीपीआर हाॅस्पिटल..कोरोना काळात आजही सीपीआर अविरत रूग्णसेवा देत आहे. कोरोनासह नाॅन कोरोना रूग्णांवर येथे उपचार सुरू आहेत. आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या 24 तास सुरू आहेत. गेल्या सफ्ताहात चार हजारांवर रूग्णांची रक्ततपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. सफ्ताहभरात येथे डेंग्यू चिकनगुनियाची रॅपीड टेस्ट सुरू होणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.प्रदीप दीक्षित यांनी दिली.
अधिष्ठाता डाॅ. दीक्षित म्हणाले, सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग सकाळी 8 पासून दुपारी 2 पर्यंत कार्यरत असतो. येथे येणाऱया सर्व संशयित, आपत्कालीन रुग्णांची तपासणी होते, आवश्यक त्या चाचण्या करून औषधोपचार केले जातात. गंभीर, अत्यवस्थ रुग्णांना तात्काळ अपघात विभागाकडे दाखल करून त्यांच्यावर तज्ञांकरवी योग्य ते उपचार केले जातात. दुपारनंतर उपचारासाठी येणाऱया रुग्णांना आंतररुग्ण म्हणून दाखल केले जाते. रोग निदानासाठी आवश्यक चाचण्या 24 तास सुरु आहेत. दैनांदिन रुग्णसेवा अखंडपणे सुरू आहे.
डेंग्यु, चिकनगुनिया व इतर साथीच्या संशायित रूग्णांच्या नमुने तपासणीकामी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाह्यरूग्ण विभागात 217 क्रमाकांच्या खोलीत नमुने स्वीकारले जातात, नंतर येणाऱ्या रूग्णांचे नमुने दुपारी 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अपघात विभागात घेतले जातात. संकलित नमुने 20 ते 25 इतक्या स्लाॅटनुसार वर्गीकरण करूनच तपासले जातात. प्राथामिक स्तरावर रुग्ण तपासणीचा अहवाल त्वारित दिला जातो. काही साशंकता असल्यास त्याची अत्याधानिक यंत्राद्वारे तपासणी केली जाते. गेल्या सफ्ताहात 25 ते 31 आॅगस्ट दरम्यान आंतररूग्ण विभागात 3640 तर बाह्यरुग्ण म्हणून 550 इतक्या रुग्णांच्या रक्तनमुन्याच्या चाचण्या केल्या आहेत.
डेंग्यू, चिकनगुनिया व इतर साथीच्या आजाराचे तपासणी अहवाल त्वारित देण्याकारिता येत्या दोन-तीन दिवसात स्थानिक पातळीवर रॅपीड टेस्ट कीटस खरेदीची प्राक्रिया राबवण्यात येत आहे. ते उपलब्ध झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे 24 तास या सुविधा सीपीआरमध्ये कार्यान्वित राहतील, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधिष्ठाता डाॅ. दीक्षित यांनी दिली.