प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलला रूग्णवाहिका मिळावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या आमदार निधीतून रूग्णवाहिकेसाठी 17 लाख मंजूर झाले आहेत. या संदर्भातील पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांना दिले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, सीपीआर हॉस्पिटला आमदार निधीतून रुग्ण्वाहिकेसाठी निधी मिळावा, अशी मागणी आपण शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे केली होती, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्या प्रयत्नाने शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी या पत्राची तात्काळ दखल घेतली आणि त्यांच्या आमदार निधीतून 17 लाख रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनालाही मिळाले असल्याचे सांगितले. निवेदन देताना राजू सांगावकर, अवधूत साळोखे, मंजित माने, राजेंद्र पाटील, हर्षल सुर्वे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.