प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यातून येणाऱया नागरिकांची नोंद ठेवण्यासाठी सीपीएड येथे विशेष कक्ष उभारण्यात आले होते. मात्र रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे पाणीच पाणी झाले. त्यामुळे अधिकाऱयांना उभे राहून काम करण्याची वेळ आली. त्यामुळे सदर विशेष कक्षाचे आता कुमार गंधर्व सभागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. परराज्यातून येणाऱया नागरिकांना सीपीएडऐवजी कुमार गंधर्व सभागृह येथे हजेरी लावावी लागणार आहे.
महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने परराज्यांतून कर्नाटकात येणाऱया नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र अन्य राज्यांमधून येणाऱया नागरिकांना सात दिवस सरकारी संस्थेत क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. परराज्यातून येणाऱया नागरिकांची नोंद ठेवण्यासाठी तसेच त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी सीपीएड मैदानावर विशेष कक्ष उभारण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून त्याठिकाणी सदर काम चालले होते. पण सहा राज्यांतून येणाऱयांना कर्नाटकात येण्यास परवानगी देण्याचे बंद ठेवण्यात आले आहे परिणामी परराज्यांमधून येणाऱया नागरिकांची संख्या घटली आहे. त्यामुळे सीपीएड मैदानावरील विशेष कक्ष बंद करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने चालविला होता. मात्र सहा राज्यांव्यतिरिक्त अन्य राज्यांमधून नागरिक येत असल्याने मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. याच दरम्यान रविवारी दुपारी झालेल्या जोरदार वाऱयासह पावसामुळे विशेष कक्षात पाणीच पाणी झाले होते. याठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपाची दुरवस्था झाली आहे. तसेच अधिकाऱयांना उभे राहून काम करावे लागले. त्यामुळे सदर कक्ष सीपीएड मैदानातून कुमार गंधर्व सभागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. परराज्यांमधून येणाऱया नागरिकांना कुमार गंधर्व सभागृहात हजेरी लावावी लागणार आहे.