सुशांतने आत्महत्या केल्याचा अंतिम निष्कर्षाप्रत सीबीआय
प्रतिनिधी/ मुंबई
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय सुशांतची हत्या की आत्महत्या याच्या निष्कर्षाप्रत पोहचली असून, ही आत्महत्या असल्याचे अनेक बाबीवरुन समोर आल्याने, याचा लवकरच क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता सीबीआयमधील सुत्रांनी वर्तविली आहे. तत्पुर्वी सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टबाबत होणारी एम्सच्या डॉक्टरांची बैठक मंगळवारी होणार असून, या बैठकीनंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.
तत्पुर्वी आतापर्यंत केलेल्या तपासात सुशांतची हत्या झाल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. मात्र आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आढळून येत असल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येबाबत सांशकता आहे. याप्रकरणाचा तपास केल्यास सुशांतच्या आत्महत्येची काही लिंक मिळण्याची शक्यता असल्याचे सीबीआयला वाटत आहे. यामुळे दिल्लीहून परतलेल्या सीबीआयच्या पथकाने दिशा प्रकरणाच्या तपासाला हात घालण्यास सुरुवात केली आहे. ज्या दिवशी दिशाने आत्महत्या केली त्यावेळी नेमके कोण-कोण उपस्थित होते. त्या सर्वाना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. एवढेच नाही तर दिशाचा प्रियकर रोहन रायची प्रथम चौकशी होणार असून, त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिशाच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे समोर येत आहे. जेव्हा तिचा मफतदेह सापडला तेव्हा तिच्या शरिरावर कपडे नसल्याचे समोर आले आहे. तसेच रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर असणाऱया पंकज याने प्रसारमाध्यमाशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, जेव्हा 8 जून रोजी दिशाने आत्महत्या केली होती त्यावेळी रुग्णवाहिकेसाठी पोलीस ठाण्यातून फोन आला होता. मात्र तो दिशाच्या घरी पोहचेपर्यंत मफतदेह खासगी गाडीतून नेण्यात आला होता. मालाडच्या दोन वेगवेगळऱया खासगी दवाखान्यात आधी नेण्यात आला, त्यानंतर कांदीवलीच्या शताब्दीमध्ये मफतदेह आणण्यात आला. यावेळी तिच्या हनुवटीशी जखम होती, एक हात तुटलेला होता आणि डोक्यातून रक्त वाहत होते. पंकजने सांगितले की जेव्हा त्याने तो मफतदेह पाहिला तेव्हा त्यावर लाल रंगाचा टॉप आणि क्रीम कलरची
लेगिंग्ज होती. दिशाचा मफतदेह मिळाला तेव्हा त्यावर कपडे होते. दरम्यान दिशा सॅलियन मफत्यू प्रकरणात चौकशी अद्याप सुरू आहे. मफत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर म्हणजेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता,अशी माहिती समोर आली होती. मात्र दिशाने 100 नंबरवर फोन केलाच नव्हता असे उघड झाले आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा खुलासा समोर आला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला बोलवून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे असे सांगितले होते असं यात म्हणण्यात आले होते. मात्र तिने हा फोन केलाच नव्हता तर त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीशी बोलत असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे यामागील सत्य नेमके काय आहे, याचा तपास करण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. तर सुशांच्या मृत्युचा क्लोजर रिपोर्ट देखील लवकरच दाखल करण्यात येणार असल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.