ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे सीबीएसई च्या 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्याचे काही पेपर पुढे ढकलण्यात आले होते. त्या उर्वरित पेपरचे वेळापत्रक सोमवारी सीबीएसई बोर्डाच्या cbse.nic.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करुन दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मी सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. 12 वीची परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार आहे. याच बरोबर 10 वीची संपूर्ण डेट शीट जाहीर झाली असून 1 जुलै ला पहिला पेपर सोशल सायन्स, 2 जुलैला सायन्स थिअरी आणि सायन्स प्रॅक्टिकल शिवाय होणार आहे. तिसरा पेपर 10 जुलै रोजी हिंदी कोर्स ए आणि कोर्स बी चा होणार आहे. चौथा 15 जुलै इंग्लिश कमुनिकॅटिवे आणि इंग्लिश लैंग्वेज, लिटचा होणार आहे. तर 12 वीचा 1 जुलैला हिंदी तर 2 जुलै रोजी होम सायन्सचा पेपर असणार आहे.
त्या बरोबरच या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना काही अटी पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. यानुसार परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना आपल्या सोबत सॅनिटायझर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये बाळगायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या तोंडाला मास्क नेबांधणे तसेच प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्स बाळगणे गरजेचे आहे. तसेच पालकांना सुद्धा आपल्या पाल्याची काळजी घेऊन त्याला खबरदारी घेण्यास सांगितले आहे.