ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी जाहीर होणार असल्याची माहिती, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, सीबीएसईचा दहावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. कालच आम्ही सीबीएसईचे बारावीचे निकाल देखील जाहीर केले. यावर्षी सीबीएसईची मेरीट लिस्ट जाहीर नाही केली.
विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.results.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
– असा पाहा निकाल
– सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेब साईट cbseresults.nic.in वर जा.
– वेब साईट वर देण्यात आलेल्या दहावी निकाल या लिंक वर क्लिक करा.
– आपला रोल नंबर टाका आणि आवश्यक ती माहिती द्या.
– निकाल पाहता येईल. डाऊलोड करता येईल.
दरम्यान, सोमवारी सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर झाला. यंदा 88.78 टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. नेहमप्रमाणेच यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 92.15 टक्के मुली पास झाल्या आहेत. 86.91 टक्के मुलं पास झाली आहेत.