ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाईट ccbseresults.nic.in यावर निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी cbse.nic.in या सीबीएसईच्या मुख्य संकेतस्थळावरही निकाल पाहू शकतात.
सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा 88.78 टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. नेहमप्रमाणेच यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 92.15 टक्के मुली पास झाल्या आहेत. 86.91 टक्के मुलं पास झाली आहेत.
यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत माहिती दिली.तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मी पुन्हा सांगतो, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमचे प्राधान्य आहे. असे निशंक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
कोव्हिड-19 मुळे यंदा गुणवत्ता यादी किंवा मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे निकाल एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.