नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएसई बोर्डांतर्गत घेतल्या जाणाऱया दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. या परीक्षांचे वेळापत्रक सोमवार, 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थी-पालकांच्या सोयीसाठी पुढील आठवडय़ात अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक जारी केले जाणार आहे. छोटय़ा विषयांच्या परीक्षा सुरुवातीला घेतल्या जाणार असून त्यानंतर मुख्य विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्य परीक्षांच्या यादीमध्ये इयत्ता दहावीचे 5 मुख्य विषय, तर बारावीचे 19 मुख्य विषय समाविष्ट आहेत. सर्वसाधारणपणे हय़ा ऑफलाईन परीक्षा 15 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होण्याची शक्मयता आहे, तर वैकल्पिक विषयांची परीक्षा 24 नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते.