दुसऱया मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्णत्वाकडे
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत मध्यवर्ती व सीबीटी बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. जुने बसस्थानक हटवून त्याठिकाणी सुसज्ज आधुनिक बसस्थानकाचे काम सुरू आहे. क्लोजडाऊन काळात देखील सीबीटी बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर असलेले पहायला मिळत आहे. गतवषी लॉकडाऊन काळात बसस्थानकाचे काम बंद होते. मात्र यंदा क्लोजडाऊन काळात सीबीटी बसस्थानकाचे काम सुरू आहे. तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱया मजल्याच्या स्लॅब भरणीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.
प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुरी जागा लक्षात घेऊन आधुनिक सीबीटी बसस्थानक उभारण्यात येत आहे. मध्यवर्ती व सीबीटी बसस्थानकाचे काम तब्बल 31 कोटी रुपयांच्या निधीतून होत आहे. मात्र मागील चार वर्षांपासून हाती घेतलेले हे काम मध्यंतरी काही काळ संथगतीने सुरू होते. तर गतवषी कोरोना काळात परप्रांतीय कामगार मूळ गावी परतल्याने बऱयाच काळासाठी काम बंद होते. मात्र क्लोजडाऊन काळात काम सुरू असून सीबीटी बसस्थानकाच्या दुसऱया मजलीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. मध्यंतरी रखडलेल्या या कामाला पुन्हा जोरात सुरूवात झाली असून स्लॅबभरणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बसस्थानकातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ पार्पिंगसाठी तळमजला उभारण्यात आला असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पार्किगसाठी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बसस्थानकातील पार्किगची समस्या मार्गी लागणार आहे.