प्रतिनिधी / बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच इयत्ता पहिली ते पीयुसी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या किंवा परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी चव्हाट गल्ली येथील सोमेश्वर पब्लिक स्कूलतर्फे मोफत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या वर्गात इंग्रजी व्याकरण व संभाषण, मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, संस्कृत व मोडी लिपीचा हस्ताक्षर अभ्यासक्रम, कराटे, शिवकालीन युद्धकला अभ्यास शिकविण्यात येणार आहे. दहावी ते बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका अंतर्गत शिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 8904251791 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.