अमेरिका-मेक्सिको सीमा
बालपण निरागस आणि निष्पाप असते, ते धर्म, जाती, वंश आणि देशांच्या सीमांपासून दूर मैत्रीत विश्वास ठेवते. हा बंधूभाव एकत्र खेळल्याने-बागडल्याने मजबूत होतो. तसेही ‘भिंती’चा उद्देश लोकांना परस्परांपासून दूर ठेवणे असतो, परंतु मेक्सिको-अमेरिका सीमेवर दोन स्थापत्यकारांनी काही झोपाळे बसविले असताना दिसून आलेले चित्र मनात साठवून ठेवण्यासारखे हेते. गुलाबी रंगाच्या या झोपाळय़ांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्रत आणून माणुसकीचे उदाहरण प्रस्थापित केले आहे. आता टिटर टॉवर वॉल या नावाने प्रसिद्ध या भिंतीला लंडनच्या डिझाइन म्युझियमने ‘बीझली डिझाइन ऑफ द ईयर’ पुरस्काराने गौरविले आहे.
जुलै 2019 मध्ये कॅलिफोर्नियातील स्थापत्यकार रोनाल्ड राइल आणि व्हर्जिनियाच्या सॅन प्रैटलो यांनी गुलाबी रंगाचे तीन सी-सॉ (एकप्रकारचा झोपाळा) अमेरिका आणि मेक्सिकोला विभागणाऱया स्टील सीमेदरम्यान बसविले असता त्या छोटय़ा हिस्स्यातील वातावरण आनंदमयी झाले आहे. या झोपाळय़ांचा एक हिस्सा अमेरिकेत तर दुसरा मेक्सिकोत आहेत. आता या झोपाळय़ांचा वापर एका बाजूला अमेरिकन आणि दुसऱया बाजूला मेक्सिकन बसला तरच शक्य आहे.
टेन्शन नव्हे आनंद देतात
द टिटर टॉवर वॉल माणसांना जोडण्याच्या नव्या पद्धतींना प्रोत्साहित करते असे उद्गार डिझाइन म्युझियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम मार्लो यांनी काढले आहेत. या भिंतीच्या एका बाजूला अमेरिकेच्या सनलँड पार्कचा हिस्सा आहे तर दुसरीकडे मेक्सिकोचा एनापरा भाग.