ऑनलाईन टीम / राजौरी :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानकडून मात्र, दिवसेंदिवस कुरापती अधिकच वाढत चालल्या आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये एक जवान शहीद झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहीद जवानाचा मृतदेह मेडिकल आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी राजौरीच्या सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.