जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावात दसरोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने विजया दशमीदिवशी शिमोल्लंघन कार्यक्रम साजरा करण्यात येतो. मागील वषीपेक्षा यावषी एक तास अधिक वेळ वाढवून द्या, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन मागणी केली.
चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठीच्या पालखीबरोबर मारुती गल्ली, बसवाण गल्ली आणि गोंधळी गल्ली येथील पालख्यांनाही यावेळी मुभा द्यावी. 20 भाविकांऐवजी 50 भाविकांना सहभाग दर्शविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
कॅम्प येथे दसरोत्सव मिरवणूक काढली जाते. ती मिरवणूक सायंकाळी 6 नंतर बंद करावी, असा दबाव पोलीस आणत आहेत. मात्र किमान एक तास त्यामध्ये वाढ करावी, असेही यावेळी जिल्हाधिकाऱयांना सांगण्यात आले. शुक्रवार दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजता मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर शिमोल्लंघन होणार आहे. त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यास अधिक भाविकांना मुभा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आमदार अनिल बेनके, सुनील जाधव, लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, परशराम माळी यांच्यासह कॅम्प व इतर परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.