महिलेने शरीरावर गोंदविले मारेकऱयांचे चेहरे
ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेला सीरियल किलर्सच्या विचारसरणीवर इतके प्रेम जडले की, तिने त्यांचे टॅटू स्वतःच्या शरीरावर काढून घेतले आहेत. या महिलेचे नाव ब्रिटनी शॅम्बर्लेन आहे. 28 वर्षीय ब्रिटनीने सीरियल किलर्सच्या टॅटूवर 1.25 लाख रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
जगातील काही सीरियल किलर्सच्या मानसिकतेमागे मी माझ्या जीवनाचा उद्देश शोधत होते. तेव्हाच हे टॅटू काढून घेण्याचा विचार आला आहे. लोक माझ्याबद्दल कुठला विचार करतात याचा मला कुठलाच फरक पडत असल्याचे ब्रिटनीचे म्हणणे आहे.
सिडनीत राहणाऱया ब्रिटनीने स्वतःच्या पायावर कुख्यात गुन्हेगार टेड बंडी आणि जेफरी डॅहमर यांचे कायमस्वरुपी टॅटू काढून घेतले आहेत. याचबरोबर ती जॅक दर रिपरचाही टॅटू काढून घेणार आहे. या सर्व गुन्हेगारांची नावे जगातील सर्वात क्रूर सीरियल किलर्समध्ये सामील आहेत.
माझ्या शरीरावरील हे टॅटू पाहिल्यावर लोक याचे कारण विचारतात आणि त्यानंतर माझ्यासोबत छायाचित्रेही काढून घेतात. कुणाकुणाला पाळीव प्राण्याचा टॅटू काढून घेणे आवडते, तर कुणाला मजेशीर गोष्टी लिहून घेणे पसंत असते, तसेच मला सीरियल किलर्सचे चेहरे गोंदवून घेणे पसंत असल्याचे ब्रिटनीने सांगितले आहे.
सीरियल किलर्सच्या मानसिकतेने अत्यंत प्रभावित ब्रिटनी याकरता फॉरेन्सिक सायन्सचे अध्ययन करत आहे. माझ्या पालकांनी हे टॅटू पाहिल्यावर प्रथम ते हैराण झाले, परंतु त्यांनी काहीच म्हटले नाही. सीरियल किलर्सच्या टॅटूमुळै लोक माझ्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करू शकत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
सीरियल किलर्समध्ये मला सर्वाधिक जेफरी डॅहमर पसंत आहे, तो एक नरभक्षक गुन्हेगार होता असे तिने सांगितले आहे. ‘ज्याला हरवू शकत नाही, त्याला खाऊन टाका’ असे डॅहमरचे म्हणणे होते. ब्रिटनी आगामी काळात आणखीन 4 गुन्हेगारांचे टॅटू काढून घेणार आहेत.