प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिलिटरी विनायक मंदिरामागील बाजूस खांब उभारून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र सदर खांबाला वाहनाने ठोकर दिल्याने सीसीटीव्ही कॅमेऱयाचा खांब मोडकळीस आला आहे.
शहरातील घडामोडी आणि घटनांवर नजर ठेवण्यासाठी विविध चौकात, मुख्य रस्त्याशेजारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विशेषतः मिलिटरी विनायक मंदिरामागील बाजूस मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर ये-जा करणाऱया वाहनांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच हनुमाननगर या उच्च वसाहतीकडे जोडणारा रस्ता आहे. येथे चौक असल्याने मोठय़ा प्रमाणात घडामोडी घडत असतात. या परिसरात घडणाऱया घटनांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विशेष खांबाची उभारणी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र रस्त्याशेजारी असलेल्या या खांबाला वाहनाची धडक बसली आहे. त्यामुळे खांब मोडकळीस आला आहे. परिणामी सीसीटीव्ही कॅमेऱयाची नजर आकाशाकडे झाली आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र विविध चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पण गणपती मंदिरशेजारी सीसीटीव्ही कॅमेरा सध्या बंद आहे. त्यामुळे येथील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेऱयाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.