गुन्हेगार स्थानिक की परराज्यातील? शोध जारी
प्रतिनिधी/ बेळगाव
विजयनगर व जयनगर येथे बुधवारी झालेल्या दोन घरफोडय़ांच्या तपासासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरुन गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असून गुन्हेगार स्थानिक आहेत की परराज्यातील याचाही शोध सुरु आहे.
बुधवारी रक्षक कॉलनी, विजयनगर येथील एका बंद घराचे खिडकीचे गज कापून तिजोरीतील 10 लाख रुपये लांबविण्यात आले होते. जयनगर येथील आणखी एका घराच्या खिडकीचे गज कापुन सुमारे 22 लाख रुपये किंमतीचे 500 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये पळविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही घरफोडय़ांमागे एकच गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावत चालला आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून फुटेजवरुन गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. या संबंधी पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.