बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या चिकमंगळूर जिल्ह्यातील मुडिगेरे तालुक्यातील कोर्टाने चेक बाऊन्स प्रकरणात कॅफे कॉफी डे संस्थापक दिवंगत व्ही. जी. सिद्धार्थ आणि कॉफी डे ग्लोबल लिमिटेडच्या संचालिका मालविका यांच्यासह अन्य आठ जणांविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
कॉफी डे ग्लोबल लिमिटेडच्या संचालक मालविका हेगडे, जयराज सी हुबळी, सदानंद पूजरी, नितीन बागमने, किरीट सावंत, जाविद परविज आणि अन्य दोघांना अटक करण्याचे आदेश मुडीगेरे जेएमएफसी कोर्टाने दिले आहेत.
कॉफी डे ग्लोबल लिमिटेडने दिलेले धनादेश बाऊन्स झाले आहेत, असा आरोप करत चिकमंगळूर येथील कॉफी उत्पादक के. नंदीश यांनी १५ जुलै रोजी न्यायालयात खटला दाखल केला होता. नंदिश यांनी दाखल केलेल्या खटल्यात ४५,३८, ५५४ लाख रुपये असल्याचे म्हंटले आहे.