वार्ताहर / पुसेगाव
पुसेगाव पोलीस ठाणे च्या हद्दीतील रणसिंगवाडी ता खटाव येथील गोपीचंद दत्तात्रय रणसिंग वय 51 वर्षे हे शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करणेस गेले असता शॉक लागून मयत झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गोपीचंद रणसिंग हे सी आर पी एफ मध्ये जम्मू काश्मीर पुलवामा येथे कर्त्यव्यावर होते ,ते गेले दीड महिन्यापासून रजेवर रणसिंगवाडी ता.खटाव येथे आलेले होते .मंगळवारी ,दि 1 रोजी गणपती विसर्जन करून बुधवारी कांदा लागण असल्याने ते मळवी नावाच्या शिवारातील शेतात टाकलेल कांद्याचे रोप भिजवण्यासाठी विहिरी वरील
इलेक्ट्रिक मोटर चालू करणेस गेले असता शॉक लागुन बेशुद्ध झाले,त्यांचा मुलगा अजित याने जवळपास असले ल्या लोकांच्या मदतीने त्यांना उपचारा साठी तातडीने पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर यांनी तपासून ते मयत झालेचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली,एक मुलगा,सून नातवंडे व आई वडील असा परिवार आहे.आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आले असून पोलीस नाईक सचिन माने अधिक तपास करत आहेत.