पहिल्या पावसात पूर्ण क्षमतेने प्रवाहित : पर्यटकांवर बंदी
प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होण्याबरोबर धबेधबे देखील प्रवाहित झाले आहेत. बेळगावपासून साधारण 20 किलो मिटर अंतरावर असलेला सुंडीचा (ता.चंदगड) वझर धबधबा देखील पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे पर्यटकांवर बंदी असल्याने पर्यटकांचा हिरेमोड झाला आहे.
नैसर्गिकरित्या डोंगर खुषीत वसलेला हा धबधबा आता जोरदार पावसामुळे पहिल्याच पावसात पर्यटकांना साद घालत आहे. मात्र पर्यटकांवर बंदी असल्याने सलग दुसऱयावषी देखील पर्यटकांना धबधब्याचा आनंद लुटता येणार नाही. डोंगर खुषीतून सुरू झालेला व शिवारातून वाहत जाणारा हा धबधबा मुख्य ठिकाणी 40-50 फुटावरून कोसळतो. त्यामुळे पावसाळय़ात दरवषी पर्यटकांची मोठी गर्दी असते.हा धबधबा हिरव्यागार निर्सगात वसलेला असून शेतातून प्रवाहीत झाला आहे. निसर्गरम्य परिसर व आजु-बाजूला असलेली हिरवीगार शेती, निसर्गसंपन्न परिसर, जैवविविधता आणि वनराई पर्यटकांना भुरळ घालते. अलिकडच्या काही वर्षात हा धबधबा नवारूपाला आला असून पर्यटकांचा ओढा देखील वाढला आहे. मात्र कोरोनामुळे गतवर्षापासून हा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरवषी पावसळय़ात चंदगडसह, बेळगाव व खानापूर तालुक्मयातील हजारो पर्यटक दाखल व्हायचे. मात्र कोरोनामुळे पर्यटकांना देखील बेक लागला आहे. त्यामुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे.