सुदैवाने प्राणहानी टळली, मात्र वाहन व घराचे नुकसान
प्रतिनिधी /फोंडा
कासवाडा-तळावली येथे एका सुकलेल्या झाडाचे खोड कोसळून एक इसम जखमी झाला. दास नाईक (63,कासवाडा) असे त्याचे नाव आहे. यावेळी घराजवळच पार्क करून ठेवलेल्या चारचाकीचीही जबर नुकसानी झाली असून निसटत्या धडकेमुळे घराच्या स्टोअररूमची हानी झाली. सदर घटना काल शुक्रवारी दुपारी 12 वा. सुमारास घडली.
फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. सुकलेल्या झाडाचे खोड कोसळताना तेथून जाणारा दास तिथे अडकता, ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करीत अग्निशामक दल पोचण्यापुर्वी त्याला सुखरूप बाहेर काढले. उपचारासाठी फोंडा उपजिल्हा इस्तिळात दाखल केले असता बांबोळी येथे पाचारण करण्यात आले आहे. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. सिंथीया नाईक हिच्या मालकीच्या चारचाकीची जबर नुकसानी झाली. सदर झाडाच्या फांद्या दोन वर्षापुर्वी कापण्यात आल्या होत्या. केवळ दोन तीन मिटरचे सुकलेले खोडासह ते झाड उभे होते.