अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांची माहिती
प्रतिनिधी / म्हापसा
सुकूर पंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते आणि पुढेही असणार आहे असे ठोस आश्वासन उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सरपंच संदीप वझरकर यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला असला तरी पंचायतीवर भाजपचेच वर्चस्व राहणार आहे अशी माहिती श्री कुडणेकर यांनी दिली. पंच अनिल पेडणेकर यांनी आपल्यावर नाहक बदनामकारक व्यक्त काढले आहे असे असले तरी त्यांनी केलेल्या आरोपांचे श्री. कुडणेकर यांनी खंडन केले व फेटाळून लावले.
पेडणेकरांनी आपले सदैव नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला
सुकूर पंचायत सरपंचावर अविश्वास ठराव संमत झाला त्यावेळी तेथील एक पंच सदस्य अनिल पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कार्तिक कुडणेकरांनी अविश्वास ठराव आण्यास अडथळा आणला. 2012 ते 17 दरम्यान आपण सुकूर पंचसदस्य होतो. आम्ही दोघेच भाजपचे होते. अनिल पेडणेकर सरपंच होते त्यावेळी ते आमदार खंवटेबरोबर होते. निविदा काढल्या. ती कामे केली नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आपल्या विरोधात सांगितले व मला कधी मदत केली नाही. उलट आपण निवडणुकीत उतरण्यास तयार आहे. उलट आपण त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे म्हटले आहे. माझे मत आहे की, तिकीट भाजपच्या कुणालाही मिळो आम्ही त्यांच्यासाठीच काम करणार. अनिल पेडणेकरांना आपली ऍलर्जी असल्याने ते नाहक आपले नाव बदनाम करू पाहत आहे. असे कार्तिक कुडणेकर म्हणाले.
आमदारांनी सुकूर पंचायतीला टार्गेट केले
आपल्या कारकिर्दीत संदीप वझरकरांना कर्ज ठेवले. 70 लाख कर्ज व 40 लाख कर, 30 लाख जीएसटी भरण्यास वझरकरांनी आपली कारकीर्द संपविली. पर्वरीचे आमदार आहे त्यांना हाकलून लावण्यासाठी आम्ही एकत्रित येऊया असे पेडणेकर म्हणत होते. आमदाराबरोबर लोक आहेत. आमदार पूर्वी बोंबाबोंब करीत होते. त्यांनी सुकूर पंचायतीला टार्गेट केले आहे. पंचायत पातळीवरील कामे पंचायत करते मात्र डांबरीकरण आदी मते आमदारांनी करायची असतात. आमदार परवा म्हणतात, सरकारने काही केलेले नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात म्हणतात सरकारने पर्वरीसाठी खूप काही केले आहे असे दुटप्पी तोंडाने आमदार बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपण चौफेर विकास केला
आपण जिल्हा अध्यक्ष होऊन मी जिल्हापंचायत फंडातून खूप कामे आणली. सुकूर चर्च ते सुकूरवाडी दरम्यान 3 कोटी 67 लाखाची कामे हाती घेतली. अन्यत्र आजूबाजूस हॉटमिक्स कामे मंजूर झाली आहे. वेताळ देवस्थानात 15 लाखाचे काम, चर्चमध्ये रिपेरींग कामे हेती घेतली आहे. 2013- 2014 साली सुकूर मैदान बांधण्यास हाती घेण्यात आले, त्याचे अद्याप काम पूर्ण होत नाही. आमदार फक्त पत्रकार परिषद घेतात. अनेक कामे आम्ही आमदारांना सांगितली मात्र त्यांनी ती कामे करण्यास आक्षेप घेतला. आमचा भाजप सरकार आहे तो देशात आहेच. आमच्या पंचायती आहे त्याच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्या आहेत. सुकूर पंचायत भाजपची होती व यापुढेही असणार आहे. सर्व पंचायत आमच्याबरोबर आहे.