आचार संहिता उल्लंघनाचा आरोप
निवडणूक आचारसंहित आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करणे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि सुखबीर सिंह बादल अणि पक्षाच्या युवा शाखेचे प्रमुख तसेच फरिदकोट येथील उमेदवार परमबंस सिंह बंटी रोमाणा यांना महागात पडले आहे. आम आदमी पक्षाच्या तक्रारीवर चौकशी केल्यावर रिटर्निंग अधिकाऱयाच्या लेखी तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
निवडणूक आयोगाकडून कोरोना महामारी पाहता इनडोअर सभागृहात 500 तर खुल्या जागेत 1000 लोकांना जमविण्याची अनुमती देण्यात आली होती. परंतु 5 फेब्रुवारी रोजी सुखबीर बादल आणि परमबंस सिंह बंटी रोमाणा यांच्याकडून नियमांकडे डोळेझाक करत 6 हजारांहून अधिक लोकांना एका ठिकाणी जमविले होते असे आढळून आल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
संबंधित तक्रारीची चौकशी फरीदकोट मतदारसंघाच्या रिटर्निंग अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी बलजीत कौर यांच्याकडून स्वतःच्या पातळीवर विविध पुराव्यांच्या अंतर्गत करण्यात आली. या चौकशीत तक्रारीत तथ्य आढळून आल्याने कारवाईसाठी फरीदकोट शहर पोलिसांना पुरावे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.