अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 30 ऑक्टोबर 2021, स. 10.40
● बाधित वाढीची पुन्हा नीचांकी नोंद
● शुक्रवारी अहवालात 32 बाधित
● मिशन युवा स्वास्थ्य अभियान जोमात
● चित्रपटगृहात झळकणार नवा कोरा सिनेमा
● वाचनालयात दिवाळी अंकांची मेजवानी
सातारा / प्रतिनिधी :
ऑक्टोबर महिना मोठा दिलासादायक ठरला आहे. शेवटच्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्केवर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवाळी उत्साह आणि आनंदात साजरी करता येणार आहे. दरम्यान, महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य अभियान सुरू केले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पंधरा महिने बंद असलेली चित्रपटगृहे नव्या कोऱ्या सिनेमाने दि. 5 रोजी सुरू होणार आहेत. दरम्यान काल दिवसभरात 3,292 तपासण्या करण्यात आल्या यामध्ये जिल्ह्यात पुन्हा नीचांकी बाधित वाढीची नोंद झाली असून फक्त 32 बाधित आढळून आले तर पॉझिटिव्हिटी दर 0.97 टक्के एवढा खाली गेला आहे.
मिशन युवा स्वास्थ्यला चांगला प्रतिसाद
सातारा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये गजबजून जाऊ लागली आहेत. महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला लसीकरण महत्वाचे आहे. त्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रमोद शिर्के यांच्या प्रयत्नातून मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात प्रत्येक विध्यार्थी लसवंत कसा होईल यावर भर दिला जात आहे. प्रत्येक कॉलेजबाहेर लसीकरण शिबिर लागलेले असते. त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमी
सप्टेंबरमध्ये ज्या प्रमाणात जिल्ह्यातील उतार होता त्याच वेगाने ऑक्टोबर महिन्यात नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर पॉझिटिव्हिटी रेट 1 वर येऊन पोहचल्याची सुखवार्ता जिल्हावासीयांना मिळाली आहे. जिल्ह्यात दि.20 रोजी 1.47 पॉझिटिव्हिटी रेट होता. दि.21 रोजी 1.28 पॉझिटिव्हिटी रेट होता. दि.22 रोजी 2.09 होता. दि.23 रोजी 1.63 होता. दि. 24 रोजी 1.04 होता.
दि. 25 रोजी 1.32 होता.
दि. 26 रोजी 1.92 होता.
दि. 27 रोजी 1.46 होता.
दि. 28 रोजी 1 पॉझिटिव्हिटी रेट होता तर दि. 29 रोजी पॉझिटिव्हिटी रेट 0.97 आहे.
मृत्यूला ब्रेक लावण्यात काहीसे यश
जिल्ह्यातील कोरोना मृत्यू होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत ऑक्टोबर महिन्यात कमी आणण्यात आरोग्य यंत्रणेला चांगले यश आले आहे. आरोग्य यंत्रणेने खूप मेहनत घेतली आहे. मग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह सर्वच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जंबो सेंटरमधील डॉक्टरांचा समावेश होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण रोखण्यात आले आहे. अगदी मागच्या आठवड्यापासून आकडेवारी पाहिली असता निदर्शनास येते. त्यामध्ये दि. 24 रोजी 3, दि. 25 रोजी 0, दि. 26 रोजी 1, दि. 27 रोजी 0, दि. 28 रोजी 0, दि. 29 रोजी 1 असा शून्यावर आणण्यासाठी यश येत आहे.
जिल्ह्यात 5 रोजी चित्रपटगृहे खुलणार
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली असली तरीही प्रेक्षक येतील गर्दी करतील असा नवा चित्रपट अद्याप तरी रिलीज झाला नाही. मात्र, दि. 5 रोजी सूर्यवंशी नावाचा चित्रपट झळकणार असून तो प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटग्रह मालकांनी तयारी सुरू केली आहे. तब्बल 17 महिन्यांनी पहिला चित्रपट झळकणार आहे.
वाचनालयात दिवाळी अंकाची मेजवानी
कोरोनामुळे सर्वजण घरात होते. अगदी वाचनालयाना ही टाळे होते. मात्र, नुकतीच वाचनालय सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने वाचकांसाठी दिवाळी अंकाची मेजवानीच वाचकांसाठी भेटीला आले असून ‘तरुण भारत’चा दर्जेदार दिवाळी अंक बाजारात उपलब्ध झाला आहे. त्यावर वाचकांच्या उडया पडत आहेत.
शनिवारपर्यत जिल्ह्यात
एकूण तपासण्या 22,27, 667
एकूण बाधित 2,51,267
एकूण मुक्त 2,43,428
एकूण मृत्यू 6, 425
उपचारार्थ 549
शनिवारी जिल्ह्यात
तपासणी 3292
बाधित 32