नवी दिल्ली
सोफा, पलंग यासारख्या फर्निचरयुक्त वस्तू बनवणारी कंपनी आयकियाने भारतीय व्यवसायासाठी सीईओपदी सुझाने पूलवेरर यांची नियुक्ती केली आहे. सुझाने या पहिल्या महिला सीईओ म्हणून आयकियाचा कारभार सांभाळणार आहेत. स्वीडनमधील मुळच्या आयकिया कंपनीने, सध्याचे सीईओ पिटर बेटजेल यांची जागा त्या घेणार असल्याचे म्हटले आहे. सुझाने या कंपनीमध्ये 1997 पासून कार्यरत आहेत.