मुंबई : सुझुकी मोटरसायकल इंडियाने चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात एकूण वाहन विक्री 72,200 इतकी झाल्याची माहिती दिली आहे. ही संख्या मागील वर्षाच्या समान महिन्याच्या तुलनेत जवळपास स्थिर राहिली आहे. जपानच्या सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने देशात फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण 71,662 वाहनांची विक्री केली होती. सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने फेबुवारी 2022 मध्ये देशातील बाजारात 58,603 वाहने विकली तर 13,597 वाहनांची निर्यात केली आहे. कंपनीचे संचालक सतोशी उचिदा यांनी म्हटल्याप्रमाणे सेमीकंडक्टरची उपलब्धता प्रभावीत होत असली तरी आम्ही फेबुवारीमध्ये आपल्या विकासाची गती कायम ठेवली असून आम्ही देशात आणि निर्यात बाजारात दोन्ही ठिकाणी कामगिरी चांगली बजावली आहे.
Previous Articleआयटीतील कर्मचाऱयांची गळतीः कारणे आणि उपाय
Next Article जे सूर्याला दिसत नाही ते कवी पाहू शकतात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.