वेगवेगळय़ा रिक्षांचे सुटे भाग जोडून फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस : खडेबाजार पोलिसांनी केली चौघा जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या नादुरुस्त झालेल्या जुन्या ऑटोरिक्षाला वेगवेगळय़ा रिक्षांचे सुटेभाग जोडून त्याची विक्री करणाऱया एका युवकासह चौघा जणांना खडेबाजार पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
सतीश सुरेश देवगोजी (वय 38, रा. सरस्वती रोड, नाथ पै सर्कल, शहापूर), रोहीत कैलास अगरवाल (वय 40, रा. न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव), समीरउल्ला नासीर डांगे (वय 39, रा. न्यू गांधीनगर), आश्फाक अहम्मद अबुफरज बेपारी (वय 29, रा. संभाजी रोड, खासबाग) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.
या चौघा जणांविरुद्ध शास्त्राrनगर येथील वर्षा विजय लालवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खडेबाजार पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, हवालदार शंकर शिंदे, गोपाल अंबी, बसवराज उज्जनकोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी या चौकडीला अटक करुन त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघडकीस आली.
उपलब्ध माहितीनुसार सुरेश देवगोजी या युवकाने वर्षा यांना एक ऑटोरिक्षा विकली होती. आरटीओ कार्यालयात त्याची नोंदणी करताना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. जुन्या चेशी व इंजीन क्रमांकावरुन वेगवेगळय़ा रिक्षांचे सुटेभाग जोडून तयार केलेली रिक्षा विकल्याचे आढळून आले होते.
स्क्रॅपमधून एका रिक्षाचे इंजिन घेण्यात आले. जुन्या रजिस्टेशन क्रमांकावरुन त्यांची विक्री करण्यात आली होती. रोहितने यासाठी चेशी पुरविली तर समीरउल्लाने इंजिन पुरविल्याचे उघडकीस आले असून चौथा अश्फाक हा व्यवसायाने मेस्त्राr आहे. त्याने हे सर्व सुटेभाग जोडून रिक्षा तयार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
या चौकडीला अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.