डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन, जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त कार्यक्रम
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सूर्यनमस्कार व योगा याच्या माध्यमातून युवापिढीने सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी क्रीडा भारती, व योग पतंजलीसह युवा पिढीने पुढाकार घ्यावा. युवकांनी नियमितपणे योगाचा सराव करावा असे आवाहन माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.
लिंगराज महाविद्यालयावर क्रीडा भारती व योगपतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सुर्यनमस्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार अनिल बेनके, मि. इंडिया सुनील आपटेकर, गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियोद्धे मुकुंद किल्लेकर, किरण मन्नोळकर, लक्ष्मण पवार, आरती कांगो आदी उपस्थित होते.
प्रभाकर कोरे पुढे म्हणाले, भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवली होती. तसेच त्यांनी भारतीय सेनेसाठी मदत म्हणून सोने जमा करून भारत सरकारला सुपूर्द करत आपली सामाजिक बांधिलकी जपली होती.
लिंगराज महाविद्यालय मैदानावर आयुष्यमान भारत सरकारच्या मान्यतेने क्रीडाभारती व पतंजली योग समितीच्या वतीने रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार .व आझादी का अमृत महोत्सव निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले.
या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता फोटो पूजन, श्रीफळ वाढून पूजन करण्यात आले, यानंतर किरण मन्नोळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पतंजली योग समितीच्या वतीने डॉ माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर राष्ट्रीय योगा व स्पोर्ट्स फेडरेशनच्या विद्यार्थिनींनी सूर्य गीतावर योगाची प्रात्यक्षिके सादर केली, यानंतर पतंजलीच्या वतीने, प्राणायाम व सूर्यनमस्कार उपस्थित विद्यार्थ्यांकडून करून घेत त्यांचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी ए. बी. शिंत्रे, कृष्णा भट, आनंद होसुर, आर एस मुतालिक, वासुदेव इनामदार, सुधीर गाडगीळ, कृष्णानंद कामत, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी,एस डिग्रज, पीईओ एल बी नाईक, संजीव नाईक, पुरुषोत्तम पटेल, व्ही एस पाटील, मोहन बागेवाडी, मोहन पत्तार, ज्योतिबा भादवणकर,एक आर नागराज, रमेश पाचापुरे, हणमंत पाटील, संगीता कोनापुरे, सी रामाराव, चंद्रकांत खंडागळे, रोहिणी पाटील, विविध शाळा व महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र भट, उमेश कुलकर्णी यांनी केले तर विश्वास पवार यांनी आभार मानले.